विजेच्या तुटलेल्या तारेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 16, 2014 04:18 IST2014-07-16T04:18:28+5:302014-07-16T04:18:28+5:30
वेळू (ता. भोर) येथे पुणे-सातारा हायवेवरती विजेची तार तुटल्याने आणि त्या तारेचा गळफास पडून आणि विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

विजेच्या तुटलेल्या तारेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
खेडशिवापूर : वेळू (ता. भोर) येथे पुणे-सातारा हायवेवरती विजेची तार तुटल्याने आणि त्या तारेचा गळफास पडून आणि विजेच्या धक्क्याने रस्त्याने चालणारी महिला कविता राजेश पाटील (वय ३१, रा. वेळू, ता. भोर, मूळ रा. मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) हिचा जागीच मृत्यू झाला.
शिंंदेवाडी चौकीतील पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजता आपल्या वेळू येथील राहत्या घरातून ही महिला कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाली असताना वेळू फाटा येथून पुण्याच्या दिशेने शंभर मीटर अंतरावर महामार्गावर रस्त्याला क्रॉस जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या विजेच्या तारेस अचानक ताण आल्यामुळे ही तार जमिनीच्या दिशेने पडत असताना प्रथमत: ही विद्युत प्रवाहाची तार एसटीला धडकून खाली पडली. यामुळे शेजारच्या रस्त्यावरून चालत असणाऱ्या कविता पाटील या महिलेच्या अंगावर तार पडली. या तारेचा ताण असल्यामुळे प्रचंड वेगात या महिलेच्या गळ्याभोवती आणि संपूर्ण शरीराभोवती विळखा घातला. विजेचा विद्युत प्रवाह बावीस हजार व्होल्टेज असल्यामुळे गळफास व शॉक बसून तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनिअर जी. एम. वाल्हेकर, आर. सी. बेंद्रे आणि ज्युनि. इंजिनिअर एस. बी. झेंडे पोहोचले. त्यांनी महिलेच्या नातेवाइकांना तातडीच्या आर्थिक मदतीसाठी पंचनामा करून पाठविला आहे.