शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चारित्र्यावरील संशयामुळे पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 19:14 IST

त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा सकाळी पेपर टाकण्याचे काम करून घरी आल्यानंतर...

पुणे : बिबवेवाडी येथील राजीव गांधीनगरमधील रामदास दशरथ चालेकर (वय ३७) याने पत्नी सारीका रामदास चालेकर हिचा गळा आवळून खून करून स्वत:ला घरामधील सिलिंगच्या लोखंडी अ‍ँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास याचा पत्नीच्या चारित्र्यावरील संशयामुळे त्यांच्याच वारंवार भांडण होत होते. दरम्यान या कारणावरून शनिवारी सायंकाळी सहापासून कडाक्याचे भांडण सुरु होते. रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रोहितही तेथेच होता. याबाबत सारिकाने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिची आई घरी आली. त्यांनी दोघांतील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला आणि रात्री एक वाजता निघून गेल्या.

मात्र तरीही दोघांत कुरबुर सुरु होती. त्यानंतर रोहित व सारिका वरच्या माळ्यावरील खोलीत झोपले. तर रामदास तळमजल्यावरील खोलीत जाऊन झोपला. पहाटे साडेचार वाजता रोहित पेपर टाकण्यासाठी घरातून बाहेर पडला. आई झोपलेली आहे. असे समजून  जाताना त्याने वडीलांना सांगितले. त्यानंतर रामदास याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा सकाळी पेपर टाकण्याचे काम करून घरी आल्यानंतर आई व वडील घराचा दरवाजा उघडत नाही म्हणून दाराच्या फटीतून बघितले असता, त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़ त्यानंतर त्याने शेजारील लोकांना मदतीला बोलवून घटना सांगितली, स्थानिकांनी तात्काळ घराचा दारवाजा तोडून पाहिले असता सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ बिबवेवाडी पोलिस ठाण्यात कळवले. बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपणार यांनी घटनेची माहीती घेऊन दोन्ही मृतदेह ससून रूग्णालयात उतरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

    चालेकर जोडप्याला दोन मुले असून त्यातील रितिक (वय १७) हा शाहू कॉलेज मध्ये ११वी मध्ये शिकत आहे़  पुणे अमेचुअर संघटनेकडून तो कब्बडी  खेळत असल्याने आपल्या आजीकडे सदाशिव पेठेत राहत असतो़  रोहित (वय १५)  हा बाहेरुन दहावीची परिक्षा देत असून सकाळी पेपर टाकण्याचे काम करतो. मृत रामदास चालेकर, हा जोशी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून तर मृत सारिका चालेकर प्रयाग हॉस्पिटलमध्ये आयाचे काम करित होती. या घटनेमुळे राजीव गांधीनगर परिसरात शोककळा पसरली. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार व वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा