झाडावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

By Admin | Updated: June 10, 2015 05:12 IST2015-06-10T05:12:11+5:302015-06-10T05:12:11+5:30

आंबे काढताना झाडाची फांदी तुटून कंपाऊंडच्या गेटवरील लोखंडी सळईवर पडल्याने समाधान रामभाऊ गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला.

Death of the tree due to falling from the tree | झाडावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

पिंपरी : आंबे काढताना झाडाची फांदी तुटून कंपाऊंडच्या गेटवरील लोखंडी सळईवर पडल्याने समाधान रामभाऊ गायकवाड (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, भोंडवेवस्ती) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड येथील केशवनगर येथे घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी : केशवनगर येथील विवेक वसाहतीत थोरवे यांचा बंगला असून, बंगल्याशेजारीच आंब्याचे झाड आहे. या झाडाचे आंबे काढण्यासाठी थोरवे दर वर्षी समाधान यांना बोलवीत. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास समाधान आंबे काढण्यासाठी चढले होते. त्या वेळी त्यांच्या वजनाने फांदी अचानक तुटली. झाडाच्या जवळच कंपांउंडचे गेट असून, त्यावर लोखंडी सळ्या आहेत. याच लोखंडी सळ्यांवर समाधान पडले. (प्रतिनिधी)

Web Title: Death of the tree due to falling from the tree