विष प्यायल्याने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: April 26, 2017 02:54 IST2017-04-26T02:54:40+5:302017-04-26T02:54:40+5:30

विषारी औषध पिऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंचर येथे घडली. किरण नंदाराम तोत्रे (वय ३०, रा. कुरवंडी, सध्या रा. मंचर) असे

Death of the teenager by taking poison | विष प्यायल्याने तरुणाचा मृत्यू

विष प्यायल्याने तरुणाचा मृत्यू

मंचर : विषारी औषध पिऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंचर येथे घडली. किरण नंदाराम तोत्रे (वय ३०, रा. कुरवंडी, सध्या रा. मंचर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंचर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथे राहणारा तरुण किरण नंदाराम तोत्रे(वय ३0) याने बुधवारी घरी विषारी औषध प्राशन केले. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना मध्यरात्री साडेबारा वाजता त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात संदीप भीमाजी बाणखेले यांनी मंचर पोलिसांत खबर दिली. पुढील तपास पोलीस राजू कांबळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Death of the teenager by taking poison