पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST2021-09-18T04:12:55+5:302021-09-18T04:12:55+5:30

पुणे : प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद ...

Death of Padma Shri Prof. Thanu Padmanabhan | पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन

पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.टी.पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनाने भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली. उदयोन्मुख वैज्ञानिकांना संशोधनाची दिशा दाखविली. भारतीय जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

प्रा.टी. पद्मनाभन यांच्या निधनाने भारतीय भौतिक, खगोल विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा मार्गदर्शक हरपला आहे. वैज्ञानिक जगताची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा.टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

-------------------------

फोटो : पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन

Web Title: Death of Padma Shri Prof. Thanu Padmanabhan