स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 22, 2017 03:38 IST2017-03-22T03:38:43+5:302017-03-22T03:38:43+5:30
शहरामध्ये स्वाईन फ्लूने एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्लूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या १६ झाली आहे.

स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू
पुणे : शहरामध्ये स्वाईन फ्लूने एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्लूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या १६ झाली आहे. शहरात जानेवारी महिन्यापासून १०१ रुग्णांची नोंद झाली असून, सध्या १६ रुग्णांचा मृत्यू झाला, ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २७ स्वाईन फ्लूचे रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
पुण्यातील ५० वर्षीय महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील द्रवांचे नमुने तपासणीसाठी १७ मार्च रोजी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले होते.
२० मार्च रोजी त्याला स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. रुग्णामध्ये स्वाईन फ्लूसह न्युमोनियाचे निदान झाले होते. पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला.
(प्रतिनिधी)