शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! काल आई गेली अन् आज वडिलांचं छत्र हरपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 19:56 IST

नशीब कधी कोणाला कोणत्या वळणावर आणून सोडेल सांगता येणे कठीण आहे.

पुणे : नशीब कधी कोणाला कोणत्या वळणावर आणून सोडेल सांगता येणे कठीण आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत झालेल्या अपघातामुळे परदेशी भावंडांनी आपला उरला-सुरला आधारही गमावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन व्यक्ती ठार झाल्या आहेत. त्यात  शिवाजी परदेशी या रिक्षाचालकाचा समावेश आहे.परदेशी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाना पेठ भागात राहते. दुर्दैवाने परदेशी यांच्या कुटुंबात गेल्या 48 तासांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. कालच शिवाजी यांच्या पत्नी प्रीती यांचे केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी शिवाजी स्वतःच्या रिक्षात आई, आत्या, दोन मुलं आणि मित्रासह आळंदीला गेले होते. विसर्जन झाल्यावर दुःखी अंतःकरणाने ते पुण्याकडे परतत होते. मात्र रस्त्यात मंगळवार पेठेत रिक्षा चाललेली असतानाच होर्डिंग कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.परदेशी यांना दोन मुले असून मुलगी समृद्धी 18 वर्षांची तर मुलगा समर्थ अवघ्या 4 वर्षांचा आहे. ही दोघेही अपघातात किरकोळ जखमी आहेत. परदेशी यांच्या मातोश्रींनाही किरकोळ दुखापत झाली आहे. आई आणि वडील दोन दिवसात गमावलेल्या या मुलांसमोर  घटनेने मात्र आयुष्यभराचा अंधार दाटला आहे.

या अपघातात देहूरोडमधील भगवानराव धोत्रे(48), पिंपळे गुरवमधील भीमराव कसार (70), नानापेठेतील शिवाजी परदेशी(40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे. तर उमेश धर्मराज मोरे (36), किरण ठोसर (45), यशवंत खोबरे (45), महेश वसंतराव विश्वेशवर (50), रुक्मिनी परदेशी (55) हे गंभीररीत्या जखमी असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तर समर्थ परदेश(4), समृद्धी  परदेशी(18) यांना किरकोळ दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. 

टॅग्स :Puneपुणे