शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गवरील अपघातात निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 11:17 IST

Buldhana Bus Accident: या घटनेमुळे  गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

निरगुडसर (पुणे ): समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८)त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८), व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत दरम्यान या घटनेमुळे  गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे वास्तव्यास आहेत. कैलास गंगावणे हे  पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात  २७ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय विदर्भ ट्रॅव्हल्स बसने पुण्याला यायला निघाले होते. आज पहाटे सिंदखेड राजा येथे पिंपळखुटा नजिक बसचा अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. गंगावणे कुटूंबातील सदस्यांनी या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही.

बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर  कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळे यांनी शोध सुरू केला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे  तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत.

अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले.विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालय बंद करण्यात आले. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातPuneपुणे