शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:43 IST

एकासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा ससूनला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

पुणे: यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या दोन तरुणांचा (वय 27 आणि 35) मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा डीजे च्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची दाट शक्यता असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून ला करण्यात आले आहे आणि त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.   नयन रवींद्र ढोके (वय 27, रा. औंध) आणि विशाल बल्लाळ (वय 35, रा. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. नयन हा मंगळवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास विजय टॉकी जवळ निपचित पडलेला दिसला. त्याबाबत पोलिसांनी स्पीकर वरून घोषणा केली असता जवळच विजय टॉकी येथे असलेल्या डायल 108 च्या आंबूलन्स वरील डॉक्टर सौरभ बारकुले आणि आणि चालक महेश राठोड तिथे पोचले. त्यांनी नयन ला तपासले असता त्याचा श्वास बंद पडलेला होता. पोलिसांच्या मदतीने तातडीने जवळील कार्डियाक आंबूलन्स मध्ये घेऊन गेले. तेथे त्याला डॉ. बारकुले, हेल्थ कॅम्प मधील फिजिशियन डॉ. तुषार जगताप व डॉ. संदीप बुटाला यांनी सीपीआर दिला. पण त्याचा उपयोग झाला नाही. 

 दरम्यान त्याला डायल 108 आंबूलन्स मधून ससूनला घेऊन जात असताना डॉ. बारकुले आणि डॉ. जगताप यांनी डिफ्रिबिलेटर (हृदय सुरू करण्यासाठी शॉक देणे) पण त्याचे हृदयाचे कामकाज सुरू झाले नाही, डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या हवाली करण्यात आला अशी माहिती डायल 108 चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियंक जावळे यांनी दिली.  

 दरम्यान दुसरा पेशंट विशाल याला विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता ससूनला आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु हा पेशंट नेमका कोठे होता, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

दोन्ही तरुणांचे मृत्यू ससूनला आणण्याधीच झाले होते. त्यांचे शवविच्छेदन केले असून नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत निश्चित निदान करण्यासाठी त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळा तपासणी करण्यासाठी राखून ठेवला आहे.   - डॉ. येल्लापा जाधव, वैदयकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024