प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:02+5:302021-08-22T04:15:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित तरुणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला ...

Death of a newlywed who had a love affair | प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित तरुणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून सिंहगड रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

निशा अजय निकाळजे (वय १९,रा. व्यंकटेश अपार्टमेंट, धायरी) असे या नवविवाहितेचे नाव आहे. निशा हिच्या गळ्यावर व्रण आढळून आले असून तिचा पती अजय निकाळजे हा घटनेनंतर पसार झाला आहे. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सांगितले.

निशा आणि अजय हे दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. त्यांनी ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते धायरी येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. अजय, त्याचे आईवडील व निशा असे चौघे एकत्र रहात होते. अजय मिळेल ते काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी अजयची बहीण घरी आली. त्यावेळी तिला निशा बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिने हा प्रकार आईला सांगितला. अजयच्या आईने व तिने तातडीने तिला नवले हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच निशाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे व त्यांचे सहकारी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला.

दिशा व अजय या दोघांची कौटुंबिक कारणावरून भांडणे होत होती. त्यातूनच हा प्रकार घडला आहे का याची तपासणी पोलीस करीत आहेत.

सिंहगड रोड पोलिसांनी आज निकाळजे राहत असलेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात अजय निघून गेल्यानंतर जवळपास दीड तासाने निशा हिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. नेमका काय प्रकार झाला हे अजय सांगू शकतो. मात्र, मोबाईल बंद करून तो पळून गेला आहे. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Death of a newlywed who had a love affair