पुण्यातील गिर्यारोहकाचे ‘माउंट नून’ मोहिमेत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:09 IST2017-08-01T04:09:57+5:302017-08-01T04:09:57+5:30
पुण्यातील आर्किटेक्ट सुभाष टकले (वय ५०) यांचे कारगिल परिसरातील ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प थ्री’ येथे सोमवारी अतिउंचीवर त्रासामुळे निधन झाले.

पुण्यातील गिर्यारोहकाचे ‘माउंट नून’ मोहिमेत निधन
पुणे : पुण्यातील आर्किटेक्ट सुभाष टकले (वय ५०) यांचे कारगिल परिसरातील ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प थ्री’ येथे सोमवारी अतिउंचीवर त्रासामुळे निधन झाले.
दिल्लीस्थित ‘अल्पाईन वाँडरर्स’ या गिर्यारोहण संस्थेकडून पुण्यातील सुभाष टकले व जितेंद्र गवारे, दिल्लीतील नितीन पांडे व जम्मू-काश्मीर येथील गुलजार अहमद हे ‘माउंट नून’ या ७१३५ मीटर उंच असणाºया शिखरावर मोहिमेसाठी जुलैच्या मध्यास रवाना झाले होते. शनिवारी शिखरमाथ्याच्या शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीवर दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे सुभाष टकले यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे वडील, पत्नी व २ मुली असा परिवार आहे. टकले हे पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेशी संलग्न होते.
२८ जुलै रोजी सुभाष टकले, जितेंद्र गवारे, नितीन पांडे व गुलजार अहमद यांनी आपल्या ४ शेर्पा साथीदारांसह ‘माउंट नून’च्या शिखर चढाईसाठी सुरवात केली. सर्व जण जेव्हा जवळपास ७ हजार मीटर उंचीवर पोहचले तेव्हा टकले यांना अतीउंचीमुळे थकवा आला. त्यांना पुढे चढाई करणे अवघड जात होते. त्यावेळी टकले यांना तेथेच विश्रांतीसाठी थांबविले व इतर गिर्यारोहकांनी शिखरावर आगेकूच केली. ते शिखराहून परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली. टकले यांना ‘कॅम्प थ्री’वर आणून व त्यांच्याजवळ अन्न-पाण्याची सोय करून जितेंद्र गवारे ताबडतोब मदतीसाठी ‘बेस कॅम्प’कडे परतला. रविवारी सकाळी ‘बेस कॅम्प’ला पोहोचताच त्याने मदतीसाठी पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेशी संपर्क साधला तसेच जवळच असलेल्या पानिखेर येथील भारतीय सैन्य दलाच्या तळावर जाऊन मदतीसाठी विनंती केली. ‘गिरिप्रेमी’ने रेस्क्यू आॅपरेशनची सूत्रे हातात घेऊन एक पथक लेहला पाठविले. यात गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे व टकले यांचे सहकारी संदीप बंब यांचा समावेश होता. ‘गिरिप्रेमी’चा दिनेश कोतकर मोहिमेसाठी लेहलाच असल्याने त्याची या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये मदत झाली.
या हेलिरेस्क्यूसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने मदत करून भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील भारतीय सैन्य दलाच्या अधिकाºयांनी या आॅपरेशनमध्ये सहकार्य केले. दुर्दैवाने हेलिकॉप्टर रेस्क्यू टीम ‘कॅम्प थ्री’वर पोहचेपर्यंत सुभाष टकले यांचा मृत्यू झाला होता.