खोरला कोरोनाने सासू-सुनेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:06 IST2021-05-03T04:06:35+5:302021-05-03T04:06:35+5:30

क्ताबाई शंकर डोंबे (वय १०५) असे सासुचे तर पारूबाई भाऊसाहेब डोंबे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या सासु सुनेचे ...

Death of mother-in-law by Khorla Corona | खोरला कोरोनाने सासू-सुनेचा मृत्यू

खोरला कोरोनाने सासू-सुनेचा मृत्यू

क्ताबाई शंकर डोंबे (वय १०५) असे सासुचे तर पारूबाई भाऊसाहेब डोंबे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या सासु सुनेचे नाव आहे.

खोर परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गावात जवळपास ७ ते ८ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर अनेक बाधित आहेत. सध्या खोरच्या भागातील कोरोनाच्या बाबतीतील परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली गेली आहे.

खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रशासन विभागाने ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, आरोग्य विभागाने या बाबत कुठलीच कारवाई केलेली नाही. प्रशासन विभागाचे हलगर्जीपणामुळे आज अनेक सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला चालता-बोलता आपला जीव गमवावा लागत आहे. येथील वाढत्या रूग्नांची संख्या लक्षात घेता तात्काळ येथील आरोग्य उपकेंद्र ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

फोटो : सासू- मुक्ताबाई डोंबे

सून - पारुबाई डोंबे

Web Title: Death of mother-in-law by Khorla Corona