शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर शहरातील उघड्या गटारात पडून वृद्धाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 09:48 IST

इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका  वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते.

ठळक मुद्देइंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका  वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्यात ठेवून जो पर्यंत इंदापूर नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

इंदापूर - इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका  वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते. मंगळवारी (7 मे ) रात्री 7.30 वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्यात ठेवून जो पर्यंत इंदापूर नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

इंदापूर शहरातील उघड्या गटारात पडून लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला. कांबळे यांच्या मृत्यूला इंदापूर नगरपालिका कारणीभूत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत तसेच मृत्यू झालेल्या कांबळे यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशीही मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. बुधवार (8 मे) सकाळी आठ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

काही दिवसांपूर्वी पंधारा येथील गटारीमध्ये खिल्लारे गुरूजी, लक्ष्मण कांबळे, त्यानंतर वडापुरी येथील एक गृहस्थांचा इंदापूर शहरातील याच गटारात पडून मृत्यू झाला आहे. तर अनेक महिला व लहान मुले पडून जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मागील दहा वर्षांपासून या परिसरातील नागरिक गटार भूमिगत करण्याची मागणी करत आहेत. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे नगरपालिका वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत असे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी सांगितले आहे.

नगरपालिकेवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा

 इंदापूर शहरातील सर्व भागातील गटारे भूमिगत केली आहेत. मात्र पंधरा या ठिकाणी मागासवर्गीय लोकांची लोकवस्ती असल्याने त्याठिकाणी इंदापूर नगरपालिकेने मुद्दाम गटारे भूमिगत केली नाहीत. त्यामुळे या गटारात पडून पूर्वीही एकूण तीन जणांचा मृत्यू व अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे इंदापूर नगरपालिकेवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. 

- विठ्ठलराव ननवरे - माजी नगराध्यक्ष, इंदापूर

 

टॅग्स :IndapurइंदापूरDeathमृत्यू