मुलाच्या मृत्यूने आईचेही निधन
By Admin | Updated: March 11, 2015 01:00 IST2015-03-11T01:00:49+5:302015-03-11T01:00:49+5:30
येथील शिवाजी गोपाळराव मदे (वय ४४), रा. राधाकृष्ण कॉलनी, संत तुकारामनगर यांचा स्वाइन फ्लूने मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूने आईचेही निधन
भोसरी : येथील शिवाजी गोपाळराव मदे (वय ४४), रा. राधाकृष्ण कॉलनी, संत तुकारामनगर यांचा स्वाइन फ्लूने मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांची आई मुक्ताबाई गोपाळ मदे (वय ७५) यांना मोठा धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाजी गोपाळराव मदे हे मूळचे लातूरचे असून, ते गेल्या वीस वर्षांपासून ते येथे वास्तव्यास होते. चाकण एमआयडीसीमध्ये ते कामाला होते. स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
३ मार्चला त्यांना आदित्य बिर्ला रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर त्यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईक घरी येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या आईला आपल्या मुलाचे बरे-वाईट झाले असल्याची शंका आली. त्याबद्दल त्यांनी विचारले असता, मुलगा शिवाजी मृत्यू झाला असल्याचे समजताच मुक्ताबाई यांना तीव्र धक्का बसल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शहरामध्येही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)