ह.भ.प.विष्णूपंत ढमाले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:10 IST2021-03-06T04:10:50+5:302021-03-06T04:10:50+5:30

ह.भ.प ढमाले महाराज हे चैतन्य विद्यालयात एस.एस.सी परीक्षेत पहिले आले होते. मुंबई येथे पोष्ट खात्यात लेखनिक होते. त्यांनी तुका ...

Death of HBP Vishnupant Dhamale | ह.भ.प.विष्णूपंत ढमाले यांचे निधन

ह.भ.प.विष्णूपंत ढमाले यांचे निधन

ह.भ.प ढमाले महाराज हे चैतन्य विद्यालयात एस.एस.सी परीक्षेत पहिले आले होते. मुंबई येथे पोष्ट खात्यात लेखनिक होते. त्यांनी तुका झालासे कळस,चैतन्य महाराज हरिपाठ प्रबोधन अशी अनेक पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत अखिल महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रवचने केली पण बिदागी कधीच घेतली नाही. त्यांच्या मागे दोन मुले, दोन विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. ढमाले मळा व ओतूर येथे शोकसभेचे आयोजन केले होते. तेथे जि. प. सदस्य मोहित ढमाले, पं स.सभापती विशाल तांबे, गजानन महाराज शिक्षण मंडळाचे वैभव तांबे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, ढमाले मळा ग्रामस्थ, ओतूर ग्रामस्थ, मान्यवर ह.भ.प. महाराज उपस्थित होते.

Web Title: Death of HBP Vishnupant Dhamale