शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'त्या' पेरू विक्रेत्याचा मृत्यू ; भाव कमी करण्याच्या वादातून झाला होता हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 12:32 IST

पेरू खरेदी करताना भाव कमी जास्त करण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी पेरू विक्रेत्याचा गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हडपसर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, प्रकृती सुधारत आली होती मात्र गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पुणे (विमाननगर)  : पेरू खरेदी करताना भाव कमी जास्त करण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी पेरू विक्रेत्याचा गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रशांत कल्याण जाधव (वय 28, रा.मांजरी बुद्रुक) याचा या घटनेत दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.  गंभीर घटना 5 फेब्रुवारी रोजी खराडी थिटेवस्ती पेट्रोलपंपाजवळ घडली होती. या खुनी हल्ल्यातील आरोपी मयूर उर्फ महेश रामेश्वर कुरंगळे (वय 30,रा.थिटेवस्ती,खराडी) याला दाखल गुन्हयात या पूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.पेरू खरेदी करताना भाव कमी जास्त करण्याच्या वादातून मयूर याने प्रशांत याला त्याच्याच पेरूच्या चाकूने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी चंदननगर पोलीसांनी आरोपी मयूर कुरंगळे याला गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत प्रशांत याला खराडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर 8 फेब्रुवारी पासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या पोटावर शस्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्याची प्रकृती सुधारत आली होती मात्र गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रशांत याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

 तो पत्नीसह मांजरी येथे राहत होता. सायकल वरून फिरून तो पेरूची विक्री करत उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दाखल गुन्हयात प्रशांत याचा मृत्यू झाल्यामुळे अटक आरोपी विरुध्द कलमवाढ करून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.

टॅग्स :Chandan NagarचंदननगरCrime Newsगुन्हेगारीMurderखून