मोशीतील कामगाराचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: January 11, 2017 03:17 IST2017-01-11T03:17:14+5:302017-01-11T03:17:14+5:30
मिनी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवरील

मोशीतील कामगाराचा अपघातात मृत्यू
पिंपरी : मिनी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवरील साम्राज्य चौकात घडली. मधुकर माहत्ताप्पा कांबळे (वय २३, रा. मोशी), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश लष्करे (वय ३४, रा. मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेले मधुकर कांबळे मोशी येथील खडी मशीनवर काम करत होते. सोमवारी पुणे-नाशिक रस्त्याने जात असताना, मिनी बसची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. (प्रतिनिधी)