पिंपरी : लसूण गिळल्यानंतर तो घशात अडकल्याने श्वास गुदमरून पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना भोसरीतील लांडगे चाळ येथे गुरुवारी रात्री घडली. नितीन प्रदीप मंडल (वय ५, रा. लांडगे चाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी, पुणे), असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, प्रदीप मंडल हे लांडगे चाळीत भाड्याच्या खोलीत राहतात. गुरुवारी रात्री त्यांच्या पाच वर्षीय चिमुरड्याने लसूण गिळला. तो घशात अडकल्याने त्याला श्वास घेणे कठीण जात होते. त्यानंतर मंडल कुटुंबीयांनी त्याला तातडीने भोसरीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुन्हा वायसीएम रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
श्वास गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू
By admin | Updated: April 29, 2017 04:13 IST