मोटारीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

By Admin | Updated: December 22, 2016 02:42 IST2016-12-22T02:42:00+5:302016-12-22T02:42:00+5:30

भरधाव जाणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ अरिफ सय्यद (वय ४७, रा़ आंबेडकर

Death of autorickshaw driver | मोटारीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

पुणे : भरधाव जाणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ अरिफ सय्यद (वय ४७, रा़ आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे़ ही घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील राजाबहादूर मोतीलाल रोडवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली़
अरीफ सय्यद राजाबहादूर मोतीलाल रोडवरील रेल्वे स्टेशनच्याजवळ रिक्षा लावून रस्त्याच्या कडेला उभे होते़ त्या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने त्यांना व रिक्षाला धडक दिली़ त्यात सय्यद यांचा मृत्यू झाला़ रिक्षाचेही नुकसान झाले़ अपघातानंतर मोटारचालक न थांबता पळून गेला आहे़
बेकरीत शिरून मंगळसूत्र हिसकावले
कॅडबरी खरेदीच्या बहाण्याने बेकरीत येऊन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़ ही घटना साडेसतरानळी येथील सत्यम बेकरीत १९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता घडली़
याप्रकरणी ५८ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्या बेकरीत असताना दुचाकीवरून दोघे जण आले़ त्यांच्यापैकी एकाने या महिलेकडे कॅडबरी मागितली़ ती देत असताना त्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरले व मोटारसायकलवर बसून ते पळून गेले़.

Web Title: Death of autorickshaw driver