शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नदीजोड बोगद्यात ८ मजुरांचा मृत्यू, वायररोप तुटून क्रेन २०० फूट खोल कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 06:22 IST

अकोले (जि. पुणे) : निरा-भीमा नदीजोड बोगद्याच्या कामातील के्रेन तुटल्याने, ती दोनशे फूट खोल कोसळून ८ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली.

अकोले (जि. पुणे) : निरा-भीमा नदीजोड बोगद्याच्या कामातील के्रेन तुटल्याने, ती दोनशे फूट खोल कोसळून ८ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली.निरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यांत जलदगतीने सुरू आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शाफ्ट खोदून बोगद्याची खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी जमिनीपासून सुमारे १०० फूट खोल बोगदा तयार करण्यात आला असून, आतमध्ये मशिनच्या साह्याने खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी ३०० कामगार काम करीत असून, जेसीबी मशिन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरू आहे.सायंकाळी बोगद्यातील काम उरकून ९ कामगार क्रेनमधून वर येत होते. या वेळी क्रेन निम्म्यापर्यंत आल्यावर तिचा रोप तुटला. त्यामुळे हे कामगार २०० फूट खोल बोगद्यात कोसळले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५ कामगारांचे मृतदेह वर काढण्यात आले होते. आणखी तीन कामगारांचे मृतदेह वर काढण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाले.>मृत मजूर परराज्यांमधीलबलराम स्वामी, सुशांत पंढी, राहुळ सुग्रीव नरूटे, मुकेश कुमार, अन्वेश सिद्धारेड्डी अशी पाच मृतांची नावे आहेत. अन्य तिघांची नावे समजू शकली नाहीत. हे सर्व जण उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश येथील आहेत.>केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पनिरा-भीमा नदीजोड प्रकल्प हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्याचे काम २०१२ रोजी सुरू झाले. मात्र, सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. तावशी ते डाळजपर्यंत सोमा आणि मोहिते या कंपनीच्या वतीने काम सुरू आहे.प्रकल्पाचा मुख्य हेतू निरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतीला देण्यात येणार आहे. बोगद्यातील रुंदी आठ मीटरपर्यंत असणार आहे.> मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीरजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेची माहिती घेतली असून, मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. सोमा एंटरप्रायजेस या कंपनीतर्फे मृतांच्या नातेवाइकांना तीन लाखांची मदत देण्यात येणार आहे.दुर्घटनेनंतर कामगारांनी दुसºया क्रेनचा वापर करूनमजुरांचे मृतदेह वर काढले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले.>इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी बोगद्यात काम सुरू असताना, सोमवारी क्रेन तुटल्याने ८ मजुरांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात