मंदिरासमोरच प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: July 5, 2017 02:52 IST2017-07-05T02:52:18+5:302017-07-05T02:52:18+5:30

सातगाव पठार भागातील कारेगाव (ता. आंबेगाव) येथे विठ्ठल रुक्मीणी मंदीरासमोर सुनिल किसन घेवडे (वय ४८) यांच्यावर प्राणघातक हल्ला

A deadly attack in front of the temple | मंदिरासमोरच प्राणघातक हल्ला

मंदिरासमोरच प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : सातगाव पठार भागातील कारेगाव (ता. आंबेगाव) येथे विठ्ठल रुक्मीणी मंदीरासमोर सुनिल किसन घेवडे (वय ४८) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी घेवडे यांच्यावर चाकू व दगडाने हल्ला केला.
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घोडके यांच्यावरील हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. आरोपीतील एकाला ओळखण्यात पोलिसांना यश आले आहे. रात्री उशीरापर्यंत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कारेगाव येथील सुनिल घेवडे पेठ येथे कामानिमित्त आले होते. गावातील सेंट्रल बँकेसमोर शेजरी उभे असताना तिघेजण दुचाकीवरून तेथे आले. कारेगावला चला असे सांगून एक तरुण घेवडे यांच्या दुचाकीवर बसला. कारेगाव येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोर घेवडे यांच्यावर चाकू व दगडाने त्या तिघांनी हल्ला केला. जखमी घेवडे यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या हातावर व पायावर, पोटावर गंभीर जखमा असून त्यांना पुढील उपचासाठी पुणे यथे पाठविण्यात आले आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाल्याचेही सांगण्यात आले. मंचर पोलिस ठाण्यात रात्री ९ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: A deadly attack in front of the temple