डिसी रूलच्या एफएसआय निर्णयाकडे लागले लक्ष
By Admin | Updated: November 6, 2015 03:08 IST2015-11-06T03:08:23+5:302015-11-06T03:08:23+5:30
शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी विकास नियंत्रक नियमावली (डिसी रुल) त्रिसदस्यीय समितीकडून सोमवारी शासनाकडे सुपूर्द केली जाईल. डिसी रुलमध्ये गावठाण, मेट्रो यासाठी

डिसी रूलच्या एफएसआय निर्णयाकडे लागले लक्ष
पुणे : शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी विकास नियंत्रक नियमावली (डिसी रुल) त्रिसदस्यीय समितीकडून सोमवारी शासनाकडे सुपूर्द केली जाईल. डिसी रुलमध्ये गावठाण, मेट्रो यासाठी किती एफएसआयची तरतूद समितीकडून केली जाते, याकडे शहराचे लक्ष लागले असून, शहरामध्ये ३ ऐवजी दोन एफएसआय निर्णयाची शक्यता आहे.
जुन्या हदद्ीचा विकास आराखडा (डिपी) बनविण्याची मुदत संपल्याचे कारण स्पष्ट करून राज्य शासनाने तो ताब्यात घेतला. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या नेतृत्त्वाखालील त्रिसदस्यीय समितीकडे तो सोपविण्यात आला. या समितीने काही दिवसांपूर्वीच या डिपीला अंतिम स्वरूप देऊन तो राज्य शासनाकडे सोपविला; मात्र डिसी रुल बनविण्यासाठी आणखी ४५ दिवसांची मुदत मागून घेतली होती.
बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या मिळण्याची प्रक्रिया
सुरळीत व्हावी. अग्निशामक व इतर ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी त्यांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागू नयेत याबाबतच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यावर त्रिसदस्यीय समितीकडून काय निर्णय घेतले गेले आहेत, ते सोमवारी स्पष्ट होणार आहे.
शहरामध्ये गावठाण, मेट्रो यासाठी ३ एफएसआय देण्याचे नियोजन समितीने निश्चित केले होते.
त्याला अंतिम स्वरूप देताना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून ३ ऐवजी २ एफएसआय दिला जाणार असल्याची माहिती नुकतीच भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी दिली आहे.