‘एक दिवस मतदानासाठी’ भाजपातर्फे जागृती अभियान

By Admin | Updated: January 23, 2017 03:24 IST2017-01-23T03:24:48+5:302017-01-23T03:24:48+5:30

भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदान जागृतीसाठी ‘एक दिवस मतदानासाठी’ अभियान २५ जानेवारीला सुरू करण्यात येत आहे.

'A day to vote' BJP awareness campaign | ‘एक दिवस मतदानासाठी’ भाजपातर्फे जागृती अभियान

‘एक दिवस मतदानासाठी’ भाजपातर्फे जागृती अभियान

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदान जागृतीसाठी ‘एक दिवस मतदानासाठी’ अभियान २५ जानेवारीला सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ध्वजवंदनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरातील सर्व चौकांमध्ये भारतमातेचे पूजन करण्यात येणार आहे. भाजपाचे सर्व पदाधिकारी, निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार यांनी प्रभागांतील चौकांमध्ये जमून भारतमातापूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी भाजपा पक्ष कार्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. प्रभाग समित्या, आचारसंहिता कक्ष, सोशल मीडिया विभाग यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुढील आठवडाभर भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.
पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सुशासनासाठी आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भाजपच्या वतीने ‘एक दिवस मतदानासाठी’ हे मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेले ‘मिशन-२०१७’ हे सॉफ्टवेअर यादीप्रमुखांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 1

Web Title: 'A day to vote' BJP awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.