शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 12:52 IST

काही उड्डाणे रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल..

ठळक मुद्देकाही विमान उड्डाणे रद्द करण्याबरोबरच वेळांमध्ये बदल, थेट विमानाऐवजी एक-दोन थांबे दोन-तीन दिवसांपासून अचानक प्रवाशांना विमाने रद्द झाल्याचे, वेळा बदलल्याचे संदेश

पुणे : धावपट्टीच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी पुणेविमानतळ सोमवार (दि. २६) पासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. पण विमान कंपन्यांनी एक दिवस आधीच विमान उड्डाणांच्या वेळापत्रक बदल केला आहे. रविवार (दि. २५) पासून बहुतेक विमानांचा वेळा बदलण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे काही विमान उड्डाणे रद्द करण्याबरोबरच वेळांमध्ये बदल, थेट विमानाऐवजी एक-दोन थांबे असे बदल करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे विमानतळ हे हवाई दलाचे आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाला विमान उड्डाणांबाबत मर्यादा येतात. हवाई दलाकडून २६ तारखेपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. हे काम पुढील वर्षभर सुरू राहणार असल्याने यावेळेतील विमानांना दिवसा नियोजित केले जाणार आहे. हा बदल २६ तारखेपासून होणे अपेक्षित असताना एक दिवस आधीच बहुतेक विमान कंपन्यांनी रात्रीची उड्डाणे रद्द केल्याचे दिसून येते. विमान कंपन्यांकडून अचानक हे बदल करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे विमानतळ रात्रीच्यावेळी बंद करण्याचा निर्णय काही दिवस आधीच झाला आहे. तरीही कंपन्यांकडून तिकीटे आरक्षित केली जात होती.

आता दोन-तीन दिवसांपासून अचानक प्रवाशांना विमाने रद्द झाल्याचे, वेळा बदलल्याचे संदेश येऊ लागले आहेत. काही ठिकाणची दिवसाची विमानेही रद्द करण्यात आली आहेत. पुणे ते जयपुर जाणारे विमान पुणे ते दिल्लीमार्गे जयपुर असे वळविण्यात आले आहे. अन्य काही ठिकाणांबाबत असे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले. दानिश सिद्दीकी यांना पुण्यातून दिल्ली मार्गे रांचीला जायचे होते. हे विमान नियोजित वेळापत्रकानुसार पहाटे होते. पण आता वेळ बदलून सायंकाळी करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य काही प्रवाशांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली आहे.-------------दिवाळीमध्ये गोव्याला जाण्यासाठी दि. १६ नोव्हेंबरची १४ तिकीटे आरक्षित केली होती. हे विमान दुपारी १२ वाजताचे असूनही रद्द करण्यात आले आहे. तसेच परतीच्या प्रवासाचे १९ नोव्हेंबरचे विमानही रद्द झाले. विमानतळ रात्री बंद राहणार असताना हे विमान का रद्द केले, हे समजले नाही. त्यामुळे आता अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.- सुमतीलाल शहा, पुणे------------एका विमान कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार शनिवार व रविवारच्या दिल्ली उड्डाणांच्या वेळाशनिवारी - रात्री ८.५५, मध्यरात्री १२.०५. ३.२०, पहाटे ५.२०रविवारी - सकाळी ८.१५, १०.१०, दुपारी २.१०, २.२५, ३.१०-------------------- 

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळairplaneविमान