दौंडला मदर तेरेसा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST2021-08-29T04:13:20+5:302021-08-29T04:13:20+5:30

संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष मोझेस पाॅल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस निरीक्षक विनोद ...

Daundla celebrates Mother Teresa's birthday | दौंडला मदर तेरेसा जयंती साजरी

दौंडला मदर तेरेसा जयंती साजरी

संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष मोझेस पाॅल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की, मदर तेरेसा यांचे कार्य महान असल्याने त्यांना जागतिक पातळीवरच्या नोबेल पुरस्कारासह भारत देशाने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मोझेस पाॅल यांनी मदर तेरेसा यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी अखिल भारतीय कलाकार महासंघाचे तालुका अध्यक्ष भारत सरोदे, नागसेन धेंडे, अमोल काळे, रतन जाधव, डॉमनीक पॅटरीक, विजय पवार, फिलीप धुमाळ ,मॅभु जोसेफ, जाॅन फेन्ड्री, अकबर शेख, सुभाष शिंदे, अश्विन वाघमारे, विनोद भालसेन, संजय काकडे, संतोष माने, दत्तू घोडे, प्रवीण गरुडकर, राजू गरुडकर, चंद्रकांत लोंढे, शाहीद शेख ,गोविंद कांबळे, संजय जाधव उपस्थित होते. यावेळी भारत सरोदे, संतोष माने यांनी येशू ख्रिस्ताचे गीत गायीले. या कार्यक्रमात ख्रिश्चन समाज भजन मंडळ तसेच कलावंतांना हार्मोनियम, ढोल, भेट देण्यात आले.

दौंड येथे संत मदर तेरेसा जयंतीनिमित्ताने कलावंतांना हार्मोनियम भेट देताना मान्यवर.

Web Title: Daundla celebrates Mother Teresa's birthday