दौंडला १०१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ७४१ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:51+5:302021-01-08T04:29:51+5:30

परिणामी प्रशासकीय इमारतीला यात्रेचे स्वरुप आले होते. तर ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र या वाहतुकीच्या कोंडीचा ...

Daundla 1012 candidates in the fray while 741 candidates withdrew | दौंडला १०१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ७४१ उमेदवारांची माघार

दौंडला १०१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ७४१ उमेदवारांची माघार

परिणामी प्रशासकीय इमारतीला यात्रेचे स्वरुप आले होते. तर ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र या वाहतुकीच्या कोंडीचा फटका शहरातील नागरिकांना बसला असल्याची वस्तुस्थिती होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुढीलप्रमाणे ४९ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (दि.१५) रोजी निवडणूक होणार आहे तर सोमवार (दि.१८) रोजी दौैंड येथील प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायत व कंसात उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :खोर, मिरवडी, टाकळी, नंदादेवी, नानगाव, नानवीज, पडवी, पाटस, कौठडी, पेडगाव, पिंपळगाव, राजेगाव, रावणगाव, सहजपूर, शिरापूर, खोरवडी, स्वामी चिंचोली, ताम्हणवाडी, उंडवडी, वरवंड, वडगावदरेकर, वाळकी, यवत, लडकतवाडी, खानवटे, खामगाव, कासुर्डी, कानगाव, कडेठाण, हिंगणीबेर्डी, हिंगणीगाडा, आलेगाव, भांडगाव, भरतगाव, बोरीबेल, बोरीऐंदी, देऊळगावगाडा, गार, गोपाळवाडी, गिरीम, लिंगाळी, मळद, खुटबाव, कोरेगाव भिवर, खडकी, कुसेगाव, सोनवडी, बिरोबावाडी.

Web Title: Daundla 1012 candidates in the fray while 741 candidates withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.