दौंड न्यूज ]
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST2021-03-10T04:11:50+5:302021-03-10T04:11:50+5:30
दौंड : गार ( ता. दौंड ) येथे महिला दिनानिमीत्त ग्रामपंचायतच्या वतीने होलेमळा येथील ...
![Daund News] | दौंड न्यूज ] Daund News] | दौंड न्यूज ]](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/pune-marathi-default-image-0_202012528113.jpg)
दौंड न्यूज ]
दौंड : गार ( ता. दौंड ) येथे महिला दिनानिमीत्त ग्रामपंचायतच्या वतीने होलेमळा येथील सुमन कृष्णा चौरे यांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सरपंच. डॉ. सुलभा गावडे उपसरपंच रामदास सुर्वे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्नेहल निवंगुणे, संभाजी होले, ऊषा सराफ उपस्थित होते.
यावेळी डिजिटल सखी कार्यक्रमाअंतर्गत उज्वला बनसोडे यांनी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी उद्योजीकता विकास प्रशिक्षण बद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी पोलीस पाटील संपत होले, हेमंत सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष माऊली निवंगुणे, दादासाहेब येडे, गणेश दोरड, सावता होले, डॉ संजय गावडे, सुरेश होले आदी उपस्थित होते. डॉ संदिप गावडे यांनी सूत्रसंचालन केले. पूनम भुजबळ यांनी आभार मानले.
फोटो - गार ( ता. दौंड येथे सुमन चौरे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करतांना सरपंच डॉ. सुलभा गावडे व मान्यवर )