दौंडला दोन उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: July 13, 2015 23:43 IST2015-07-13T23:43:34+5:302015-07-13T23:43:34+5:30
तालुक्यात ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गार ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन २ उमेदवारी अर्ज दाखल झाले

दौंडला दोन उमेदवारी अर्ज दाखल
दौंड : तालुक्यात ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी गार ग्रामपंचायतीसाठी आॅनलाईन २ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता इच्छुकांची धावपळ सुरू आहे. अर्ज आॅनलाईन भरायचा आहे, तर त्या अर्जाला लागणारी आवश्यक ती कागदपत्रे तहसील कचेरीत उमेदवारांनी दाखल करायची आहेत.
तालुक्यातील आलेगाव, वडगाव दरेकर, हिंगणीबेर्डी, पेडगाव, गिरीम, खोरवडी, शिरापूर, लिंगाळी, नानवीज, सोनवडी, खानोटा, कौठडी, रावणगाव, नंदादेवी, बोरीबेल, खडकी, स्वामी चिंचोली, मळद, राजेगाव, वरवंड, हिंगणीगाडा, कडेठाण, गार, कुसेगाव, हातवळण, पाटस, कानगाव, देऊळगावगाडा, गलांडवाडी, बोरीपार्धी, नानगाव, यवत, ताम्हाणवाडी, भरतगाव, कासुर्डी, खामगाव, भांडगाव, खोर, सहजपूर, मिरवडी, कोरेगाव भिवर, खुटबाव, उंडवडी, पिंपळगाव, लडकतवाडी, टाकळी, गोपाळवाडी या ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. (वार्ताहर)
...तर कारवाई
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दौंडचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे तसेच यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी गावपातळीवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे. जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना बैठकीदरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत.