शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

दौंड बाजार समिती निकाल: थोरातांच्या गडात कुलांचा शिरकाव; दोन्ही गटांचे ९-९ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 17:31 IST

राहुल कुल समर्थकांनी गुलालाची उधळण करुन शहरातून राहुल कुल यांची मिरवणूक काढली...

दौंड (पुणे) :दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली. विशेष म्हणजे माजी आमदार रमेश थोरात यांच्या २५ वर्षाच्या सत्तेला आमदार राहूल कूल यांनी आव्हान दिले. अखेर सभासदांनी दोन्ही गटांना खेळवत ९-९ जागा मिळवून दिल्या. त्यामुळे थोरातांच्या गडावर कुलांचा शिरकाव झाला असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत कुलांना ही बाब जमेची ठरणार आहे. राहुल कुल समर्थकांनी गुलालाची उधळण करुन शहरातून राहुल कुल यांची मिरवणूक काढली.

सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली ग्रामपंचायत, व्यापारी आडते, हमाल मापाडी या मतदारसंघात मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाले तर सोसायटी गटात घासून लढत झाली. सुरुवातीला ग्रामपंचायत मतदारसंघाचे चारही उमेदवार भाजपा आणि मित्र पक्ष पुरस्कृत राहुल कुल गटाच्या जनसेवा विकास पॅनलला चार जागा मिळाल्या त्यानंतर पाचवी जागा हमाल मापारी मतदारसंघाची कुल गटाला मिळाल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली होती.

एकंदरीत जस जशी मतमोजणी होत गेली त्यानुसार कुल थोरात या दोन्हीही गटाला प्रत्येकी नऊ नऊ अशा समसमान जागा मिळाल्या दरम्यान कुठल्याही पॅनलला वर्चस्व मिळाले नाही सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीनंतर दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी कुठल्या गटाचे वर्चस्व राहील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र सभापती आणि उपसभापती सोडत पद्धतीने निघतील अशी एकंदरीत परिस्थिती राहील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंध हर्षित तावरे यांनी काम पाहीले.

विजय उमेदवार कंसात मिळालेली मतेसहकारी संस्था मतदार संघ

पोपटराव ताकवणे ( ७८६ ), गजिनाथ आटोळे (७३५), सचिन शेळके ( ७३५) ,संतोष आखाडे (७२९), शरद कोळपे,(७२५), बापूसाहेब झगडे (७२४), भारत खराडे ( ७१९) ,वर्षा मोरे ( ७८१), गीतांजली शिंदे ( ७५८), जीवन मेत्रे ( ७८६) , बाळासाहेब शिंदे (७८३).ग्रामपंचायत मतदार संघ

गणेश जगदाळे ( ५१२), अतुल ताकवणे ( ४८७), राहुल चाबुकस्वार (४८६) , अशोक फरगडे ( ५०१).व्यापारी आडते मतदारसंघ

संपत निंबाळकर ( १०१), सुनील निंबाळकर ( १००)हमाल मापाडी मतदारसंघ

कालिदास रुपनवर ( २३)२९ दौंडदौंड येथे राहुल कुल यांची काढण्यात आलेली जल्लोष मिरवणूक.

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक