दौंडला पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
By Admin | Updated: March 9, 2017 04:14 IST2017-03-09T04:14:12+5:302017-03-09T04:14:12+5:30
दौंड येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन नवनाथ जगदाळे यांच्यावर बलात्काराचा

दौंडला पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
दौंड : दौंड येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन नवनाथ जगदाळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
नितीन जगदाळे (मूळ रा. बालाजीनगर, एसआरपी ग्रुप नं. ५, सध्या रा. मुंबई) आणि तरुणीची २००५ मध्ये दौंड तिकीट घराजवळ भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली आणि माझ्यावर प्रेम आहे असे नितीन याने मला भासविले. त्यानंतर वेळोवेळी महाबळेश्वर, पाचगणी, वाकड, पुणे या ठिकाणी नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला, तसेच माझी फसवणूकदेखील केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(वार्ताहर)