शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथील अपघातात सासऱ्यासह सुनेचा मृत्यू; वाहनचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:47 IST

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. 

ठळक मुद्देनोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहत मृत दत्तात्रय भुजबळअपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून झाला फरार

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी व फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मृत दत्तात्रय भुजबळ हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहतात. आज सकाळी दत्तात्रय भुजबळ हे त्यांच्या सुनेसह त्यांच्या एम एच १२ के एक्स ०७६३ या दुचाकीहून बीड येथे चालले होते. आज सकाळी भुजबळ हे पुणे नगर रस्त्याचे कडेला दुचाकी लाऊन एका हॉटेल जवळ थांबले. त्यांनतर चहा घेऊन त्यांच्या दुचाकीजवळ जाऊन दुचाकीवर बसत असताना भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ सि एक्स ७१४२ या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, व त्यांनतर कार काही अंतरावर असलेल्या शेजारील झाडावर जाऊन आदळून थांबली. यावेळी दुचाकीवरील दत्तात्रय भुजबळ व मोहिनी भुजबळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारीपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून फरार झाला आहे.

सदर झालेल्या अपघातात दत्तात्रय सोनबा भुजबळ (वय ५२) व मोहिनी अतुल भुजबळ (वय २४, दोघे रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. टाकळसिंग ता. आष्टी, जि. बीड) यांचा मृत्यू झाला  असून याबाबत राजू सोनबा भुजबळ (रा. डोंगरवस्ती, सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. टाकळसिंग ता. आष्टी जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करत आहे.

टॅग्स :PuneपुणेBeedबीडAccidentअपघातShikrapurशिक्रापूर