शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुलगी झाली मंचरची सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 21:53 IST

Gram Panchayat Election: बिनविरोध निवड : सरपंचपदी किरण राजगुरू, तर उपसरपंचपदी युवराज बाणखेले

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर: मंचर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची कन्या किरण राजगुरू यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपसरपंचपदी माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज प्रल्हाद बाणखेले यांची बिनविरोध निवड झाली आहे. (daughter of a Gram Panchayat employee became the Sarpanch of Manchar.)

मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचा गट यांनी मिळून निवडणूक लढविली. तीनही पक्षाच्या महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला या जागेसाठी आरक्षित आले होते. प्रभाग क्रमांक ४ मधून किरण देविदास राजगुरू या एकमेव अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून विजयी झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड निश्चित होती. उपसरपंचपद राष्ट्रवादी किंवा बाणखेले गटाला मिळणार होते. ग्रामपंचायत सभागृहात सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कालेकर व सहाय्यक के. डी. भोजने यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली.

सरपंचपदासाठी किरण देविदास राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना सदस्य सतीश अरुण बाणखेले हे सूचक होते. उपसरपंच पदासाठी उत्सुकता होती. मात्र, या जागेसाठी युवराज प्रल्हाद बाणखेले यांचा एकमेव अर्ज आला. त्यांना ग्रामपंचायत सदस्य ज्योती निघोट या सूचक झाल्या. सरपंच, उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडले गेल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कालेकर यांनी केली. नवनिर्वाचित सरपंच किरण राजगुरू व उपसरपंच युवराज बाणखेले यांचा सत्कार सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अविनाश रहाणे, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, रामदास बाणखेले, मंगेश बाणखेले, प्रवीण मोरडे, संजय बाणखेले, अश्विनी शेटे, अरुण लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरडे, दीपाली थोरात, सुप्रिया राजगुरव, वंदना बाणखेले, सविता शिरसागर, श्याम थोरात, रंजना आतार, पल्लवी थोरात, ज्योती थोरात, ज्योती बाणखेले, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, माणिक गावडे आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, नवनाथ नाईकडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मंचर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कन्या सरपंचपदी विराजमान झाली आहे. मागील ३५ वर्षांपासून मंचर ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची किरण राजगुरू ही कन्या आहे. सध्या कार्यालयीन प्रमुख या पदावर काम करणारे देविदास राजगुरू यांचे अभिनंदन अनेक जण करत होते. शिवसेना ग्राहक मंचाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू यांची सरपंच किरण राजगुरू ही पुतणी आहे. लोकनेते माजी खासदार स्व.किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज बाणखेले हे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले असून अण्णांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच