शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: दत्तात्रय भरणेंच्या पत्नी सारिका भरणे थिरकल्या 'परदेशिया' गाण्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:17 IST

महिला दिनाचे औचित्य साधुन इंदापूरात कोव्हीड योद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित लतायुग कार्यक्रमात सारिक यांनी 'परदेशीया' या गाण्यावर ठेका धरत डान्स केल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाच्या काळात अनेकदा कार्यकर्त्यां सोबत मिरवणुक, लग्न वरात व सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स केल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु मंत्रीमहोदयांच्या सौभाग्यवती सारिका भरणे यांना डान्स करताना कुणीही कुठेही पाहिल्याची चर्चा ऐकण्यात आली नव्हती. ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधुन इंदापूरात कोव्हीड योद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित लतायुग कार्यक्रमात सारिक यांनी 'परदेशीया' या गाण्यावर ठेका धरत डान्स केल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

  इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मैत्रीण ग्रुप यांच्या संयक्त विद्यमाने खास महिलांसाठी इंदापूर नगरपरिषद शेजारील मराठी शाळेत महिला कोव्हीड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा  आयोजित केला होता. व जागतिक महिला दिना निमित्त भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना त्यांच्या लोकप्रिय गीताद्वारे आदरांजलीपर लतायुग कार्यक्रम ही ठेवण्यात आला होता. यावेळी सारिका भरणे या प्रमख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. कोरोना काळात सामाजीक कार्यात ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना सारीका भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 लता मंगेशकर आदरांजली कार्यक्रमादरम्यान लोगो को कहेने दो, कहेते ही रहेने दो, सच झुट हम सबको पता है। मै भी हूँ मस्तीमे, तुभी है मस्तीमे,आ इस खीशी मे नाचे गाये। किस को पता क्या किसने किया, सब कहेते है तुने मेरा दिल ले लिया। या गाण्यावर उपस्थित महिलावर्ग नाचत असताना सारिका यांनी अन्य महिलांसोबत ठेका धरला. आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला आघाडी शहराध्यक्षा उमा इंगोले, मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका अणुराधा गारटकर व हेमा बाब्रस आदी उपस्थित होते.

टॅग्स :IndapurइंदापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीdanceनृत्यLata Mangeshkarलता मंगेशकर