फुलांच्या राख्या आणि शहाळ्यांनी सजले दत्तमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:36+5:302021-08-24T04:15:36+5:30
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षी फुलांची राखी, शहाळ्यांची आकर्षक आरास व ...

फुलांच्या राख्या आणि शहाळ्यांनी सजले दत्तमंदिर
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षी फुलांची राखी, शहाळ्यांची आकर्षक आरास व धार्मिक विधी मंदिरात आयोजित करण्यात आले होते. या वेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, अॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.
नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमेनिमित्त चंद्रकांत भोंडे यांच्या हस्ते रविवारी दत्तयाग पार पडला. तर, श्रावणी सोमवारनिमित्त ट्रस्टचे विश्वस्त युवराज गाडवे, सुप्रिया गाडवे, अनुष्का गाडवे, अथर्व गाडवे यांच्या हस्ते रुद्रयाग झाला. अमोल मुळ्ये गुरुजी व ब्रह्मवृंदांनी याचे पौरोहित्य केले. संपूर्ण मानवजातीवरचे कोरोना संकट त्वरित नष्ट होऊन जग भयमुक्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री दत्त महाराजांचरणी करण्यात आली.