घोडेगावात दत्त जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST2020-12-30T04:15:35+5:302020-12-30T04:15:35+5:30

सकाळी मंदिरात अभिषेक व महापुजा करण्यात आली, त्यानंतर दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक आले होते. दरवर्षी दत्त जयंती निमीत्त ...

Datta Jayanti celebrated in Ghodegaon | घोडेगावात दत्त जयंती उत्साहात साजरी

घोडेगावात दत्त जयंती उत्साहात साजरी

सकाळी मंदिरात अभिषेक व महापुजा करण्यात आली, त्यानंतर दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक आले होते. दरवर्षी दत्त जयंती निमीत्त बैलगाडयांच्या भव्य शर्यती आयोजीत केल्या जात होत्या मात्र बैलगाडा शर्यतीला बंदी असल्याने फक्त घोडेगाव शहरातुन मानाच्या गाडयांची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सखारामपाटील काळे, सुरेशशेठ काळे, सुनिल इंदोरे, स्वप्निल घोडेकर, दशरथ काळे, शाम काळे, विनोद आण्णा कासार, गजानन काळे, राकेश काळे घोडेगाव व पंचक्रोशितील नागरिक, गाडामालक मोठया संख्येने उपस्थित होते सायंकाळी ह.भ.प.मोहन महाराज जोशी यांचे दत्तजन्माचे किर्तन झाले. त्यानंतर घोडेगाव शहरातून पालखी काढण्यात आली.

--

29122020-ॅँङ्म-ि02 झ्र श्री दत्त जयंती निमीत्त घोडेगाव शहरातुन मानाच्या गाडयांची काढलेली मिरवणूक

Web Title: Datta Jayanti celebrated in Ghodegaon