युवा क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दशरथ भोंग यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST2021-03-23T04:10:17+5:302021-03-23T04:10:17+5:30

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप व उपाध्यक्ष व उद्योजक धरमचंद लोढा, मावळते अध्यक्ष अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर ...

Dashrath Bhong elected as the President of Yuva Kranti Pratishthan | युवा क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दशरथ भोंग यांची निवड

युवा क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दशरथ भोंग यांची निवड

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप व उपाध्यक्ष व उद्योजक धरमचंद लोढा, मावळते अध्यक्ष अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृहात या निवडी झाल्या. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथील येथे भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून काम केलेल्या पी. व्ही. मुजावर यांचा सत्कार करून आपल्या कार्यास प्रारंभ केला.

यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. एम. के. इनामदार, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, महाराष्ट्र स्माईल प्लस फाउंडेशनचे संस्थापक योगेश मालखरे, गिर्यारोहक अनिल वाघ, आदर्श गोपालक हाजी रज्जाक पठाण, व्यसनमुक्त चळवळीचे प्रा. धनंजय देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या वेळी युवा क्रांती प्रतिष्ठानच्या दहा वर्षांतील सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीराजांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले. या वेळी सोलापूर मल्लिकार्जुन रक्तपेढीच्या वतीने १५३ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. तर २५ तरुणांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी सॅम्पल दिले. यावेळी डॉ. संजय शिंदे, ज्ञानेश्वर डोंगरे, सचिन परबते उपस्थित होते.

२२ इंदापूर सन्मान

इंदापूर येथे रक्तदात्यांचा सन्मान करताना नूतन पदाधिकारी व मान्यवर

Web Title: Dashrath Bhong elected as the President of Yuva Kranti Pratishthan