‘श्यामपटा’तून महाभारताचे दर्शन
By Admin | Updated: February 13, 2017 01:35 IST2017-02-13T01:35:20+5:302017-02-13T01:35:20+5:30
रमणबाग प्रशालेच्या भव्य रंगमंचावर असलेली ऐतिहासिक पात्रं, डोळे दीपवणारी प्रकाशयोजना, समोर बसलेले रसिक आणि रंगमंचावर

‘श्यामपटा’तून महाभारताचे दर्शन
पुणे : रमणबाग प्रशालेच्या भव्य रंगमंचावर असलेली ऐतिहासिक पात्रं, डोळे दीपवणारी प्रकाशयोजना, समोर बसलेले रसिक आणि रंगमंचावर उलगडत जाणारे महाभारताचे विविध पैलू. अशा वातावरणात पार पडला श्यामपट हा दीर्घांक.
भरतमुनी जयंतीनिमित्ताने शनिवारी संपूर्ण देशभर एकाच दिवशी, एकाच वेळी सूर्यास्तासमयी विविध प्रांतांतून, विविध कलाकारांच्या माध्यमातून सुमारे ७०० ठिकाणी श्रीकृष्णाच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृती सादर केल्या गेल्या. या उपक्रमाअंतर्गत संस्कारभारती पुणे महानगर नाट्यविधीतर्फे ‘श्यामपट’ या दीर्घांकाचे सादरीकरण करण्यात आले. या दीर्घांकाचे लेखन व दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले असून नाट्यविद्येच्या ४० कलाकारांचा यात सहभाग होता.
ऐतिहासिक रंगमंच व्यवस्था, ४० कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण, ढोलांच्या वादनाने कथेत भरलेला रंग यामुळे सादरीकरण एका वेगळ््याच उंचीवर पोहोचले. (प्रतिनिधी)