इंदापूरमधील सगळ््या रस्त्यांवर अंधार

By Admin | Updated: February 2, 2017 03:42 IST2017-02-02T03:42:47+5:302017-02-02T03:42:47+5:30

नगरपरिषदेकडे असणारी पाच कोटी रुपयांची महावितरण विभागाची थकबाकी भरण्यासाठी आठवडाभराची मुभा देवून देखील ती भरली गेली नसल्याने,आज( दि.१) दुपारी दोन वाजता

Darkness on all the roads in Indapur | इंदापूरमधील सगळ््या रस्त्यांवर अंधार

इंदापूरमधील सगळ््या रस्त्यांवर अंधार

इंदापूर : नगरपरिषदेकडे असणारी पाच कोटी रुपयांची महावितरण विभागाची थकबाकी भरण्यासाठी आठवडाभराची मुभा देवून देखील ती भरली गेली नसल्याने,आज( दि.१) दुपारी दोन वाजता महावितरण विभागाने नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व स्ट्रीट लाईट व दोन्ही पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.
थकबाकी असल्याने, १०० फूटी शंकरराव पाटील मार्ग, दूधगंगा रस्ता, व्यंकटेशनगर परिसर अशा शहरातील पाच ठिकाणच्या स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणने तोडला होता.ती भरली नाही तर नाईलाजास्तव क्रमाक्रमाने इतर रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडण्यात येणार असल्याचे संकेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाकडील २ कोटी ३६ लाख १६ हजार ८६० रुपए तर स्ट्रीट लाईटचे २ कोटी ६७ लाख रुपये असे वीजबिल थकीत आहे.गेल्या दहा वषार्पासून महावितरण कंपनी ही थकबाकी भरावी,यासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत आहे.तथापि आश्वासन व तुटपुंजी रक्कम भरुन नगरपरिषदेचे प्रशासन वीज पुरवठा सुरळीत ठेवत आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात भूमिगत स्ट्रीट लाईट करण्याचे २०० कोटीचे काम मंजुर झाल्याची घोषणा केली होती.सदर कामाच्या निविदा अद्याप निघाल्या नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना विचारणा केली असता,त्यांनी सांगितले की, सन १९९६ -९७ पासून वीजबिल थकले आहे. १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळवून बील भरण्याचा प्रयत्न करणार आहोत.

२० वर्षांची थकबाकी
नगराध्यक्षा उज्वला राऊत म्हणाल्या की, ही २० वर्षांची थकबाकी आहे. ती एकदम भरण्याची नगरपरिषदेची ऐपत नाही. नगरपरिषदेस वसुली शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. वसुलीच्या प्रमाणात थकबाकी भरण्याची तरतूद करण्यात येईल. येत्या आठवड्यात तीन लाख रुपये भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Darkness on all the roads in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.