शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

विद्यार्थ्यांसह नागरिकांचा बॅकवॉटरमधून धोकादायक प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 18:54 IST

होडीतुन धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण

ठळक मुद्दे रोजची कामे व शेतीची कामांसाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून होडी द्वारे धोकादायक प्रवास

शिक्रापूर : खेड व शिरूर तालुक्याला जोडणाऱ्या तीन वाड्या वस्त्यांमधील विद्यार्थी व नागरिकांना थिटेवाडी बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमधून होडीतून प्रवास करुन शाळा किंवा कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या होडीतुन धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण आहे.सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या जालिंदर नगर, मुक्ताईनगर ,शेरेवस्ती येथील सुमारे ४० विद्यार्थ्यांना पाबळ येथे शाळेसाठी यावे लागते. नागरिकांना रोजची कामे व शेतीची कामांसाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून होडी द्वारे धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा जलपर्णीमध्ये बोट अडकल्याने तासन्तास विद्यार्थ्यांना व नागरिकांना भर पाण्यात थांबावे लागते. बोट ओढण्यासाठी लावलेला दोर देखील धोकादायक पद्धतीने तुटण्याची शक्यता असते. मागील दहा पंधरा दिवसापूर्वी झोडकवाडी किनाºयावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या होडीमधून एक लहान मुलगी पाण्यात पडली होती. मोठ्या प्रयत्नानंतर इतर विद्यार्थ्यांनी तिला बाहेर काढले होते. होडीतून प्रवास करताना दोर तुटण्याच्या शक्यतेमुळेही भीती वाटत असल्याचे अनेक मुलींनी सांगितले आहे. याठिकाणी कठडे नसल्याने बोटीतून उतरतांना मोठी कसरत करावी लागते. साधारण २० ते ३० फूट खोल असलेल्या पाण्यात प्रवास  करताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. होडीला प्रशिक्षित नावाडी देखील नसल्याने अनेक वेळा स्थानिक नागरिक अथवा विद्यार्थी स्वत: होडी  घेऊन प्रवास करतात. अनेक आंदोलनानंतर थिटेवाडी बंधारा पूर्ण झाला, भागातील पाणीप्रश्न मिटला.मात्र येथील अनेक समस्या आजही प्रकर्षाने जाणवत आहेत. प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्यावर पूल बांधण्याची मागणी होत असून खेडच्या भागात असलेल्या परंतु रोज पाबळला जाणाऱ्या लोकांसाठी समस्या निर्माण झाली आहे. केंदूर मुक्ताईनगर कनेरसर झोडकवाडी या साडेतीन किलोमीटर अंतरासाठी सव्वातीन कोटी च्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच या ठिकाणी एक पुल देखील मंजूर केला असल्याचे राजकीय मंडळीन कडून सांगण्यात येत असून हे काम लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरWaterपाणीStudentविद्यार्थी