ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा

By Admin | Updated: October 14, 2016 04:56 IST2016-10-14T04:56:16+5:302016-10-14T04:56:16+5:30

पुणे- गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर नगरजवळील वांबोरी येथे सशस्त्र टोळक्याने दरोडा टाकून प्रवाशांची लूटमार केली. सात ते आठ जणांनी चाकूच्या धाकाने

Dangda Express on Dnyananga Express | ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा

ज्ञानगंगा एक्सप्रेसवर दरोडा

पुणे : पुणे- गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर नगरजवळील वांबोरी येथे सशस्त्र टोळक्याने दरोडा टाकून प्रवाशांची लूटमार केली. सात ते आठ जणांनी चाकूच्या धाकाने प्रवाशांचा ऐवज लुटला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानगंगा एक्सप्रेस सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी दौंड रेल्वे स्थानकावरून सुटली. या वेळी जनरल डब्यामध्ये सात ते आठ तरुण बसले होते. नगर सोडल्यानंतर वांबोरी स्टेशनजवळ क्रॉसींगसाठी गाडी थांबली होती. दरोडेखोरांनी प्रवासादरम्यानच सावज हेरण्यास सुरूवात केली होती. गाडी थांबल्यावर प्रवाशांना अचानक मारहाण करायला सुरूवात केली. चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. सात ते आठ पुरुष प्रवाशांना मारहाण केली. गाडी मनमाड येथे पोहाचल्यावर प्रवाशांनी पोलीसांकडे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मनमाड येथे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Dangda Express on Dnyananga Express