दौंड बाजारभाव भुसार मालाचे भाव तेजीत
By Admin | Updated: June 10, 2014 23:49 IST2014-06-10T22:40:50+5:302014-06-10T23:49:48+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारा ओल्या भुईमुग शेंगाची आवक सुरु झाली असून बाजारभाव तेजीत आहे.

दौंड बाजारभाव भुसार मालाचे भाव तेजीत
दौंड : दौंड तालुक्यात भुसार मालाची आवक स्थिर असुन बाजारभाव तेजीत राहीले. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारा ओल्या भुईमुग शेंगाची आवक सुरु झाली असून बाजारभाव तेजीत आहे. तसेच लिंबाची आवक कमी झाल्याने बाजारभाव स्थिर निघाले. दौंड येथे मुख्य बाजारात फळभाज्या, पालेभाज्यांची आवकेसह बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती महादेव यादव आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरित्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१0 किलोप्रमाणे) - टोमॅटो (५२) ३0-७0, वांगी (२८) ४0-१00, दोडका (१0) ६0 ते १५0, भेंडी (२४) १00 ते २५0, कार्ली (११) १00 ते २00, हिरवी मिरची (३१) १६0 ते ३00, भोपळा (३८) २५ ते ६0, काकडी (४७) ५0 ते १५0, कोथिंबीर (१५३४ जुड्या) २00 ते ५00, मेथी (११२१ जुडी) २00-५00.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहु (एफ.ए.क्यु.) (३0८) १४५१ ते २000 ज्वारी (१७) १६00 ते २१0१, हरभरा (७) २३00 ते २४00, लिंबु (२१) २५0-६00.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहु (एफ.ए.क्यु.) (८0९) १५00 ते २000, ज्चारी (१७३) १७५१ ते २५0१, बाजरी (१९0) १३५१-२0५१, हरभरा (५१) २000 ते २३00, मका (७९) ११५0 ते १३00, चवळी (८२) ५२00 ते ५७00, मुग (२७) ५५00 ते ६000, ओली शेंग (३३५ पोती) १९00 ते २२00 लिंबु (९६) २५0-७८0. पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (१४६) १४७५ ते २000 ज्चारी (१३) १७१५ ते २१३१, बाजरी (२१) १४२१-२१00, मका (१७) १२00 ते १२५0.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (२४) १५00 ते २१0१, ज्चारी (२४) १६00 ते २३११, बाजरी (५) १३५१-२१0१, लिंबू (४७) ६00 ते १२00.