नृत्य शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

By Admin | Updated: March 2, 2017 23:36 IST2017-03-02T23:36:14+5:302017-03-02T23:36:14+5:30

तळेगाव दाभाडे (ता. मावळ, पुणे) येथील नृत्य कलेचे शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय विद्यार्थीनीवर नृत्य शिक्षकाकडूनच बलात्कार झाल्याची घटना

Dance teacher's student's rape | नृत्य शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

नृत्य शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 02 -  तळेगाव दाभाडे (ता. मावळ, पुणे) येथील नृत्य कलेचे शिक्षण घेत असलेल्या  एका १५ वर्षीय  विद्यार्थीनीवर नृत्य शिक्षकाकडूनच बलात्कार झाल्याची घटना  तळेगाव दाभाडे जवळील  वराळे फाटा येथे  बुधवारी घडली.
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा  फासल्याच्या या घटनेने परिसरात निषेध व्यक्त होत आहे. 
रघु नरसिंह बोडिके (वय २५ रा. वराळे ता. मावळ जि.पुणे, मूळ रा. आंध्र प्रदेश ) असे  आरोपीचे नाव आहे. वडगाव मावळ न्यायालयाने त्यास पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या  माहितीनुसार रघु बोडिके हा तळेगाव दाभाडे हद्दीत वराळेफाटा येथे  नृत्य कलेचे वर्ग चालवित होता . पीडित
विद्यार्थीनी ही नृत्य कला शिकण्यासाठी आली असता, तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. 
घडला प्रकार पीडित मुलीने  तिच्या आईला सांगितला. तळेगाव पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये बलात्काराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Dance teacher's student's rape