शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

नृत्याने जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला : सुकन्या मोने-कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 18:49 IST

मी अभिनेत्री असले तरी नृत्य ही माझी मूळची आवड असून त्यातून मला मन:शांती मिळते.

पुणे : नृत्याने मला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. मुंबईतील अत्यंत धावपळीच्या जीवनात माणसाला स्वत:चा शोध घ्यायला लावणा-या नृत्य या माध्यमाचा खूप उपयोग होईल. त्यामुळे पुण्यात नृत्याचे जसे वातावरण आहे तसे मुंबईतही निर्माण व्हायला हवे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुकन्या कुलकर्णी- मोने यांनी शनिवारी व्यक्त केले.  'कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'लाउड अँप लॉज डान्स मॅगझिन'तर्फे ह्यसंचारीह्ण या दोन दिवसाच्या नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) व प्राजक्ता परांजपे यांच्या सहकायार्ने होणा-या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे- चापेकर, लाऊड अँप लॉज डान्स मॅगझीनच्या नेहा मुथियान, प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना मेथिल देविका, नृत्यांगना ऐश्वर्या वॉरिअर, नृत्य समीक्षक सुनील कोठारी, दिग्दर्शक लुब्धक चॅटर्जी, ह्ण एनएफएआयह्णचे संचालक प्रकाश मगदूम या वेळी उपस्थित होते.सुकन्या कुलकर्णी- मोने म्हणाल्या, बरीच वर्षे शारीरिक व्याधींमुळे मी नृत्यापासून दूर होते. परंतु नृत्य कायमच मनात रुंजी घालत होते. अडचणींवर मात करून आता जवळपास २८ वर्षांनी मी भरतनाट्यमचा कार्यक्रम करू शकले. मी अभिनेत्री असले तरी नृत्य ही माझी मूळची आवड असून त्यातून मला मन:शांती मिळते.नृत्यातून साहित्य, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांचा आविष्कार होत असतो. नृत्यविषयक चित्रपटांमध्ये चित्रपट हे माध्यम नृत्याला एक वेगळा आयाम देते, असे  सुचेता भिडे- चापेकर यांनी सांगितले.उदघाटनानंतर राजेश कदंबा आणि नृत्यांगना मेथिल देविका यांनी दिग्दर्शित केलेला  ह्यसर्पतत्त्वह्ण हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटानंतर डॉ. सुचेता भिडे चापेकर यांनी मेथिल देविका आणि कदंबा यांच्याशी संवाद साधला. जगात विविध संस्कृतींमध्ये सपार्ला विशेष असे स्थान लाभले असून, त्याच्याबरोबर जीवनाचे तत्वज्ञानही जोडले गेले आहे. मोहिनीअट्टम नृत्याच्या माध्यमातून वेध घेतानाचा अनुभव मेथिल देविका यांनी सांगितला.

टॅग्स :PuneपुणेSukanya Kulkarniसुकन्या कुलकर्णीdanceनृत्य