रोहिदास जयंतीनिमित्त नृत्याविष्कार

By Admin | Updated: March 25, 2017 04:01 IST2017-03-25T04:01:57+5:302017-03-25T04:01:57+5:30

संत रोहिदासमहाराज जयंतीनिमित्ताने शनिवारवाड्याच्या पटांगणावर नृत्याचा नजराना पुणेकरांना अनुभवयास मिळाला.

Dance on the occasion of Rohidas Jayanti | रोहिदास जयंतीनिमित्त नृत्याविष्कार

रोहिदास जयंतीनिमित्त नृत्याविष्कार

पुणे : संत रोहिदासमहाराज जयंतीनिमित्ताने शनिवारवाड्याच्या पटांगणावर नृत्याचा नजराना पुणेकरांना अनुभवयास मिळाला. हा कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघ व राजाभाऊ पोटे यांनी आयोजित केला होता.
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सोमनाथ शिंदे, जगदीश पोटे, प्रशांत कोरेगावकर, विक्रांत ढवळे, संतोष टोणपे, सुखदेव सूर्यवंशी, श्रीकुमार काळे उपस्थित होते. कथक, भरतनाट्यम, बॉलिवूड, फ्री स्टाइल असे अनेक नृत्याच्या प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेले भूषण अहिरे यांचा सत्कार अण्णा थोरात, प्रवीण परदेशी, विपेन खटावकर, अमित गायकवाड, राजाभाऊ पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Dance on the occasion of Rohidas Jayanti