हा तर नृत्य, वक्तृत्वाचा संगम

By Admin | Updated: January 9, 2017 02:39 IST2017-01-09T02:39:38+5:302017-01-09T02:39:38+5:30

पुण्यात जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हे रसिक, कलाकारांचं पुणं आहे. कलाकारांचा गौरव, सन्मान करण्याची पुण्याची तीनशे वर्षांची परंपरा आहे.

This is the dance, the combination of the eloquence | हा तर नृत्य, वक्तृत्वाचा संगम

हा तर नृत्य, वक्तृत्वाचा संगम

पुणे : पुण्यात जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हे रसिक, कलाकारांचं पुणं आहे. कलाकारांचा गौरव, सन्मान करण्याची पुण्याची तीनशे वर्षांची परंपरा आहे. या परंपरेतील पुरस्कारार्थी असलेले पं. सुरेश तळवलकर यांचे वादन म्हणजे तबल्यावरच नृत्य, बोटातून प्रकट होणारं उत्कृष्ट दर्जाचे वक्तृत्व आहे, असे गौरवोद्गावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.
महापालिकेच्या वतीने ‘स्वरभास्कर पुरस्कार’ तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना उपमहापौर मुकारी अलगुडे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि १ लाख ११ हचार १११ रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी पं. उल्हास कशाळकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘‘पं. तळ्वलकर, पं. कशाळकर ही सरस्वतीची मुलं आहेत. ते केवळ वादन किंवा गायन करीत नाहीत
तर पुढच्या पिढीला शिकवण्याची परंपरा त्यांनी निर्माण करून मोठं काम केलं आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: This is the dance, the combination of the eloquence