धरणग्रस्तांसाठीचा कॅम्प काही मिनिटांत गुंडाळला
By Admin | Updated: January 21, 2015 23:17 IST2015-01-21T23:17:51+5:302015-01-21T23:17:51+5:30
प्रकल्पग्रस्तांचा दाखले देण्यासाठी आयोजित केलेला कॅम्प धरणग्रस्तांमधील दोन गटांच्या राजकारणामुळे काही मिनिटांमध्ये गुंडाळावा लागला.

धरणग्रस्तांसाठीचा कॅम्प काही मिनिटांत गुंडाळला
पाईट : भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपसा सिंचनाचा परवाना व प्रकल्पग्रस्तांचा दाखले देण्यासाठी आयोजित केलेला कॅम्प धरणग्रस्तांमधील दोन गटांच्या राजकारणामुळे काही मिनिटांमध्ये गुंडाळावा लागला.
भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दि. २१ व २२ जानेवारी रोजी पाईट येथे उपसा सिंचनाचे परवाने व प्रकल्पबाधित असल्याचे दाखले देण्यासाठी क^ॅम्पचे आयोजन पुनवर्सन विभागाच्या वतीने केले होते.
कॅम्प घेण्यासाठी अधिकारी वर्ग गावात आले असता, गावामधील सभामंडपात कॅम्प घेण्याची गावातील एका गटाने सर्व तयारी केली होती. दुसऱ्या गटाने गावात कॅम्प घेण्यास विरोध करीत कॅम्प मंगल कार्यालयात घेण्यासाठी आग्रह धरला. याबाबत अधिकाऱ्यांवर दोन्ही गटांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा दबाव येत असल्याने, अखेर कॅम्पच शासकीय जागेत तलाठी कार्यालयात घेण्याचा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला.
या वेळी माजी सरपंच बळवंत डांगले याच्या मते गावात कॅम्प घेतल्यास धरणग्रस्तांना सर्व प्रकारच्या कागदपत्रांच्या नक्कल, प्रतिज्ञापत्र, फोटो काढण्याची सुविधा मिळाली असती.
यामुळे लोकांचा वेळ वाचून जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला असता, तर विद्यमान सरपंच अश्विनी रौंधळ यांच्या मते, कार्यक्रम मंगल कार्यालयात घेण्याचे अगोदरच ठरल्यामुळे, कार्यक्रम कार्यालयातच झाला पाहिजे, असा आग्रह धरला होता.
कॅम्प चालू झाल्यानंतर अनेक धरणग्रस्तांना लागणारे फॉर्म, तसेच त्यासाठी काय कागदपत्रे लागतात, याची माहितीच नसल्याने तसेच अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे असल्याशिवाय प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा आग्रह धरल्याने धरणग्रस्तांची मोठी निराशा झाली.
या कॅम्पसाठी उपस्थित असलेले पुनर्वसन तहसीलदार अनिल कारंडे यांनी धरणग्रस्तांनी सिंचन व दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण झालेले प्रस्ताव पुनर्वसन विभागात जमा करण्यास सांगितले. या वेळी नायब तहसीलदार वाजे, पुनर्वसन विभागातील अधिकारी रेंगडे, तलाठी जाधव, अमोलीक व आदी कर्मचारी उपस्थीत होते.
एकंदरीत दोन गटांमधील पुनर्वसनाचा गेल्या २० वर्षांत चाललेला गोंधळ याही मेळाव्यात धरणग्रस्तांना अनुभवयास मिळाला. इतर १७ गावांमधून आलेल्या धरणग्रस्तांना हेलपाटा व मनस्ताप सहन करावा लागला.
येथील तलाठी जाधव यांना वस्तुस्थिती नक्की काय? याबाबत विचारले असता, कॅम्प आमदार व खासदार हे उपस्थित नसल्याने रद्द केला होता.
परंतु, माजी सरपंच बळवंत डांगले , दत्ता रौंधळ व ग्रामपंचायत सदस्य जयसिंग दरेकर यांनी २१ तारखेला कॅम्प होणार असल्याचे सर्वत्र
सांगितले असल्याने कॅम्प रद्द करणे उचित होणार नाही, त्यामुळे कॅम्प
इतर जागा उपलब्ध नसल्याने गावातील सभा मंडपात घेण्याचे
ठरले होते. प्रत्यक्ष कॅम्प घेण्याच्या
वेळी या बाबत राजकारण
झाल्याचे त्यांनी सांगितले.
(वार्ताहर)
४धरणग्रस्तांचे सिंचन व प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्यासाठी प्रकल्पबाधित गावांमधील सर्वच तलाठ्यांना या वेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामधील अहिरे गावच्या सजावर असलेले तलाठी अमोलीक यांच्याकडे प्रकल्पग्रस्त १३ गावांच्या सजांचा पदभार असल्याने त्यांनी कोणाला व कसे दाखले द्यावे, हा प्रश्न निर्माण
झाला होता. तसेच
सर्वच गावांचे दफ्तर आॅनलाइन साठी असल्याने एकाही शेतकऱ्याला दाखले या वेळी मिळाले नसल्याचे अनेकांनी सांगितले.