जिल्ह्यातील धरणसाठा वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:04+5:302021-09-06T04:14:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने ओढ दिली होती. जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या साठ्यात कोणत्याही ...

The dam stock in the district started increasing | जिल्ह्यातील धरणसाठा वाढू लागला

जिल्ह्यातील धरणसाठा वाढू लागला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यात संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने ओढ दिली होती. जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या साठ्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. धरणातील साठ्यांमध्ये आता हळुहळू पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महिनाभरापासून उजनीतील साठाही (६०.७६ टक्के) स्थिर आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात कोणत्याही प्रकार वाढ झाली नव्हती. विशेषत: कुकडी प्रकल्पातील धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस पडला असून ऑगस्ट महिना संपत आला तरी प्रकल्पात केवळ ५७.२३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच खेड तालुक्याचा काही भागासह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी कुकडी प्रकल्पातील आवर्तन अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे असते. मात्र, अद्याप समाधानकार पाऊस न पडल्याने येथील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाने माेठी ओढ दिली असल्याने येणाऱ्या रब्बी हंगामाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात (मुठा खोरे) ९३.२६ टक्के (२७.१९ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. नीरा खोऱ्यात देखील ८९.९६ टक्के चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. तर कुकडी प्रकल्पात ५७.२३ टक्के साठा, तर नाझरे धरणांत केवळ २४.२२ टक्के पाणीसाठा आहे.

----

‘उजनी’तील पाणीसाठा महिनाभरापासून स्थिर

पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६०.७६ टक्के (३२.५५ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीतून उजनी धरणात येणाऱ्या विसर्ग मागील महिनाभरापासून मंदावला आहे. ८ ऑगस्टला ६१ टक्के पाणीसाठा होता. मात्र, मागील महिनाभरात विसर्ग केल्याने त्यातील साठाही काहीसा कमी झाला आहे.

------

चौकट

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती

धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी-टक्केवारी

टेमघर ३.७१ ३.३८ ९१.०१

वरसगाव १२.८२ १२.८२ १००

पानशेत १०.६५ १०.१३ ९५.१३

खडकवासला १.९७ ०.८६ ४३.६४

पवना ८.५१ ८.५१ १००

कासारसाई ०.५७ ०.५५ ९७.५७

मुळशी १८.४७ १७.१६ ८५.१२

कळमोडी १.५१ १.५१ १००

चासकमान ७.५८ ७.३५ ९६.९९

भामा आसखेड ७.६७ ६.९६ ९०.८०

आंध्रा २.९२ २.९२ १००

वडीवळे १.०७ ०.९० ८३.८८

शेटफळ ०.६० ०.०८ १४.१७

गुंजवणी ३.६९ ३.३२ ९०.०३

भाटघर २३.५० २१.९१ ९३.२३

नीरा देवघर ११.७३ ११.७३ १००

वीर ९.४१ ६.५१ ६९.२२

नाझरे ०.५९ ०.१४ २४.२२

पिंपळगाव जोगे ३.८९ १.३० ३३.४७

माणिकडोह १०.१७ ४.८५ ४७.६५

येडगाव २.८० ०.७२ ३७.२१

वडज १.१७ ०.८५ ७३.०२

डिंभे १२.४९ १०.९८ ८७.९१

चिल्हेवाडी ०.९६ ०.५८ ६०.१०

घोड ५.४७ १.०३ २१.१७

विसापूर ०.९० ०.०९ ९.९१

उजनी ५३.५७ ३२.५५ ६०.७६

Web Title: The dam stock in the district started increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.