दुबार मतदारांवर संक्रांत

By Admin | Updated: January 12, 2017 02:25 IST2017-01-12T02:25:18+5:302017-01-12T02:25:18+5:30

महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य

Dabur voters converge | दुबार मतदारांवर संक्रांत

दुबार मतदारांवर संक्रांत

पुणे : महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य निवडणूक आयोगाने चांगलाच लगाम घातला आहे. या वेळी प्रथमच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी एकाच दिवशी २३ फेबु्रवारी मतदान होणार असल्याने या दुबार मतदारांना जिल्हा परिषद अथवा महापालिका एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातही मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. यातील अनेक मतदारांची नावे राजकीय सोयीसाठी दोन्ही ठिकाणी नोंदविण्यात आली आहेत. शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील दुबार नावे मोठ्या प्रमाणात कोथरूड, सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज परिसरात आहेत. पुरंदर आणि दौंडमधील नावांचा समावेश हडपसर आणि कोंढवा परिसरात आहेत. वडगाव शेरी, खराडी, चंदननगरमध्ये मोठ्या प्रमाणात शिरुर आणि हवेली तालुक्यातील मतदारांची दुबार नावे आहेत. जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील मतदार भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात आढळून येतात. निवडणूक कार्यालयाच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या पाहाणीमध्ये जिल्ह्यात तब्बल साडे सहा लाख मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने आजही मतदार यादीत ही नावे कायम आहेत.

 जिल्ह्यात आता पर्यंत नेहमी जिल्हा परिषद
व महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तारखामध्ये किमान १० ते १५ दिवसांचे अंतर होते. त्यामुळे दुबार नाव असणारे अनेक मतदार नेहमीच दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याचा अनुभव आहे. परंतु दुबार मतदारांच्या दोन्ही ठिकाणी मतदान करण्याला निवडणूक आयोगाने चांगला लगाम लावला आहे.

 शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्यांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Dabur voters converge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.