शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'बापमाणूस'; लॉकडाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांसह भुकेल्या पोटांसाठी डबा उपलब्ध करून देणारा 'बसचालक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:59 IST

अत्यावश्यक सेवेतील कुणीही असो किंवा कुणी पांथस्थ त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं काम हा 'योद्धा' करीत आहे.

ठळक मुद्दे पंढरपूर आगारातील चालकाचा अन्नदानाचा यज्ञ..

पुणे : शहराच्या कोणत्याही भागात डबे पोहोचविणारे 'डबेवाले' सर्वांना परिचित आहेत. पण असाही एक समाजभान जपणारा 'डबेवाला कोरोना योद्धा' आहे. जो एसटीमधील कोणताही कर्मचारी असो किंवा एखादा गरजवंत अथवा ज्यांची जेवणाची सोय नाही अशांसाठी सदैव तत्पर असतो. अत्यावश्यक सेवेतील कुणीही असो किंवा कुणी पांथस्थ त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं काम हा 'योद्धा' करीत आहे. या योद्ध्याला अन्नदानाचं जणू वेडचं लागलं आहे.       या' डबेवाला कोरोना योद्ध्याचं ' नाव आहे राजेंद्र नागटिळक. एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगारात ते चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या विधायक कार्यात त्यांची पत्नी सुरेखा नागटिळक देखील खंबीरपणे साथ देत आहे. त्या केबीपी महाविद्यालय येथे अध्यापनाचे काम करतात.  'कोरोना संसर्गावर विजय मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, एसटीचे कर्मचारी हे  'कोरोना वॉरियर्स' अहोरात्र झटत आहेत . अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला आहे. मात्र या लढाईत या दांपत्यानेही खारीचा वाटा उचलला आहे.  कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत 'लॉकडाऊन' असल्याने अत्यावश्यक सेवेतील मंडळीना देखील विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे . हॉटेल बंद असल्याने वेळेवर जेवण देखील मिळत नाही.ही बाब राजेंद्र नागटिळक यांच्या लक्षात आली अन सोबतीच्या विविध चालक वाहक वा अन्य अत्यावश्यक सेवेतील मंडळीना चक्क ते आपल्या घरातूनच डबे घेऊन जाऊ लागले . पनवेलवरून एसटी घेऊन आल्यामुळे राजेंद्र नागटिळक हे सध्या चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत.    या अनोख्या प्रवासाविषयी सुरेखा नागटिळक 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या,खरंतर रस्त्यावर फिरल्यानंतर लोकांचे खरे प्रश्न कळतात. एसटी चालवताना रस्त्यावर लहान मुलांच्या पायात चपला नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांचं काळीज कळवळायचं.  माझ्याजवळ त्यांना द्यायला काहीच नव्हतं असं ते म्हणाले आणि मलाही वाईट वाटलं. मग काय करता येईल असा विचार करू लागलो.बिस्किट किंवा दोन डझन केळी ठेवा म्हटलं तर ज्येष्ठांना खाता येणं शक्य नाही. मग मी ज्वारीमध्ये तांदूळाचे पीठ घालून त्यांच्याबरोबर दहा भाक-या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा देण्यास सुरूवात केली. दिवसभर ती भाकरी त्या व्यक्तीला खाता आली पाहिजे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आज लोक त्यांची गाडी ओळखायला लागली आहेत. या कामातून आम्हाला खूप समाधान मिळत आहे. आम्ही अन्न घेऊन येतो म्हणून माणसं येतात की माणसं येतात म्हणून आम्ही अन्न घेऊन जातो हेचं कळत नाही. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेच्या वेळेला जावं लागायचं. साहेब त्यांचा डबा चालकांना द्यायचे त्यामुळे त्यांच्याजवळच्या भाक-या साहेब लोकांना उपयोगी पडल्या.पनवेल ड्युटी लागली तेव्हा खूप माणसं दिसतील तेव्हा केळी आणि बिस्कीटं ठेवा असं सांगितलं. लोकांना

आपल्या परीने मदत करण्यासाठी खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. अनेक वर्षांपासून आमचा हा उपक्रम सुरू आहे. सध्या पनवेलवरून आल्यामुळे चौदा दिवसांसाठी ते होम क्वारंटाईन झाले असले तरीही कुणाला डबे पोहोचवायचे आहेत का? म्हणून मित्रांना फोन करत असतात. सतत अन्नदानाचे विचारच त्यांच्या मनात चालू असतात.

टॅग्स :PuneपुणेPandharpurपंढरपूरBus DriverबसचालकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न