शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

डी. एस. कुलकर्णी यांची आॅडी कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 8:36 PM

आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.  डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे बुधवारीही पोलिसांची चौकशी सुरू होती. आता आपली यातून सुटका नसल्याची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून पोलिसांना सहकार्य मिळू लागले आहे. पोलीस डीएसके यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयात घेऊन जाऊन दिवसभर कागदपत्रांची तपासणी करीत होते. तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.डीएसके व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने गेल्या शुक्रवारी १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी त्यांच्याकडून तपासासाठी पोलिसांना सहकार्य मिळाले नव्हते. गेल्या सात दिवसात पोलिसांना त्यांनी तपासात सहकार्य करण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही ठेवीदार व फ्लॅटधारकांचा पैसा कोठे वळविला, याची पुरेशी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेली नाही. आता मात्र ते सहकार्य करू लागले आहेत. या सात दिवसात डीएसके यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना दररोज वैद्यकीय तपासणीसाठी नेणे, आणणे यात तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. या गुन्ह्याचा आवाका मोठा असल्याने ही पोलीस कोठडी पुरेशी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरुवारी न्यायालयात पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढू मिळावी, यासाठी विनंती केली जाण्याची शक्यता आहे. डीएसके यांच्या वकिलांकडून त्याला विरोध केला जाईल. त्याचवेळी डीएसके यांच्याविरुद्ध कोल्हापूर आणि मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनीही आपल्याला पोलीस कोठडी मिळाली अशी विनंती न्यायालयात केली आहे. न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना पोलीस कोठडी वाढून दिली नाही तर, कोल्हापूर अथवा मुंबई पोलिसांकडून त्यांना तपासासाठी आपल्या ताब्यात द्यावे, अशी विनंती केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी